Day 01
पहाटे गजरानी नाही तर इरा च्या call नि जाग आली. ताडकन उठण्याच्या shock मधेच शून्य मिनिटात गाडीत जाऊन बसलो. मेंदू अजून गादीतच लोळत होता. इरा बऱ्याच वर्षां नंतर हिमालयात trek ला येत होती. पहिल्यांदाच रमा आणि आदी पासून इतक्या दिवस लांब, त्यामुळे तिच एक मन airport च्या अलीकडे आणि एक मन पलीकडे असं झालं होत. शेवटी सगळ्यांना टाटा, बायss बायss केलं आणि आम्ही airport मध्ये शिरलो.
आता पुढचे काही दिवस शरीर, मन आणि हृदय हातात हात घालून चालणार होते, कारण आम्ही हिमालयाच्या कुशीत चाललो होतो. Check-in करेस पर्यंत अश्विन आणि गौरी पण आले.
कोण आपण कुठले ? काही वर्षांपूर्वी कोणाचं नाव, गाव, अता पता माहित नसलेले आपण. डोंगरांवर असलेल्या प्रेमापोटी एकत्र आलो. जस मोत्यांच्या सरीत ला, न दिसणारा धागा सगळ्या मोत्यांना एकत्र बांधून ठेवतो तस डोंगरांवरच्या प्रेमानी आपली गुंफण केली.
जस विमान नेपाळ च्या हद्दीत आलं तस क्षितिजावर गोऱ्यापान डोंगरांनी दाटी केली. उंच ढगांची मिरासदारी संपली. आता ते, जस लहान मुलं आई च्या पायाशी लोळतात तसे ते डोंगरांच्या पायाशी लोळत होते. मना नि आता हात सोडला आणि ते ह्या डोंगरा वरून त्या डोंगर वर, ह्या दरी तुन त्या दरीत हुंदडायला लागलं.
शंभु नि आमचं खास नेपाळी style नि स्वागत केलं. Toyota च्या Hiace च धूड गल्ली बोळातून आम्हाला मुक्कामी नेत होत. आज आम्ही Holy Himalaya हॉटेल मधे वस्तीला होतो. सगळे hotel च्या जाम प्रेमात होते.
समोरच मित्राच्या restaurant मध्ये जेवण केलं आणि Thamel मध्ये सगळे सुटलो.
Thamel म्हणजे trekkers ची तुळशीबाग च आहे. जश्या जगातल्या बायका तुळशीबागेत रमतात तस trekker च इथे आल्यावर होत, पायच निघत नाही. Thamel च्या गल्ली बोळातून फिरत होतो. दीपिका पदुकोण च्या वीतभर कमरे येवढे रस्ते, वर बघितल्यावर आकाश पण वीतभर दिसत होत, जस काय सांदण valley मधेच आहोत. उरली सुरली खरेदी करून मुक्कामी आलो.
उद्या पासून wonderland ची सफर सुरू.
trinityadventure.in
।। श्रीकृष्णार्पणमस्तू ।।
Day 02
आज पासून अंघोळीला बत्ती. आकंठ breakfast करून बस मधे बसलो. पोखराचा नागमोडी प्रवास सुरु झाला. ६. ७ तासांच्या प्रवासा नंतर पोखरात पोचलो.
स्टॅन्ड वर आमचा guide ‘नवांग’ आणि porter ‘मायला’ दाई (नेपाळी भाषेत मोठ्या भावाला दाई म्हणतात) आणि ‘बसंता’ आले होते. guide आणि porter म्हणणं चूक आहे, खरंतर extended family च. आमचा आजचा पडाव Eco Restaurant Hotel मध्ये होता. एक पडी मारून मी आणि अश्विन चक्कर मारायला बाहेर पडलो. काठमांडू च Thamel मार्केट म्हणजे आपल्या रविवार, भवानी पेठे सारखं गजबजलेलं, तर पोखरा म्हणजे आपलं Camp आणि KP सारखं. full happening. हिरवळच हिरवळ. रात्री कुठे जेवायचं ते ठरवून सगळ्यांना हॉटेल मधून बाहेर काढायला गेलो.
पोखरा म्हणजे City Of Lake. Lake वर चक्कर मारायला गेलो. डावी कडे lake उजवीकडे मस्त shack. Trek नंतर भेट द्यायलाच पाहिजे असा माहोल.
Lake च्या काठावर सगळे बसलो होतो. पाण्यावर हालचाल होती, वारा वहात होता, श्वास येत होते जात होते, हृदय पण धडधडत होत, पण वेळ मात्र थांबली होती. ज्यांनी ज्यांनी वेळ थांबणं काय असत हे अनुभवलं त्यांच आयुष्य खऱ्या अर्थानी प्रवाही असत. ढगांनी रंग बदलला, ते जडावले होते, काळवंडले होते. टीप टीप पावसाला सुरवात झाली, तो धो-धो बरसाय च्या आत आंम्ही restaurant मध्ये घुसलो. ‘अन्नपूर्णे’ नि आमचं चिंब स्वागत केलं. अता extended family मधे पाऊस पण add झाला. पुढचे एक दोन तास जेवण येईस पर्यंत कांदा भजी चेंबवत, पावसाकडे पहात, गप्पा हाणत बसलो. माहोलच असा होता कि बस, बसूनच रहावं, बुड उचलूच नये.
trinityadventure.in
।। श्रीकृष्णार्पणमस्तू ।।
Day 03
।। श्रीकृष्णार्पणमस्तू ।।
No comments:
Post a Comment