मढेघाट
ऑक्टोबर चा सूर्य मढेघाटाचा सगळा परिसर भाजून काढत होता. गरम वाऱ्याची झुळूक स्टीमबाथ घेतल्याचं फीलिंग देत होती. बिचारी झाड, जिथे सावली मिळेल तिथे अंग मुरकुटून बसली होती. पक्षी पण सावलीतच दबा धरून बसले होते. बावन्नकशी सोन्या पेक्षा सूर्याचा जर्द पिवळा रंग सभोवार पसरला होता. अंधारमय रात्री नंतर पहाटेच्या कोवळ्या किरणां च्या स्वागतासाठी आसुसलेली शृष्टि आता त्याच्या तीक्ष्ण किरणां पुढे निश्चेष्ट पडली होती. क्षितिजावर अजस्त्र सह्याद्रीची रांग अजगरासारखी वेटोळे घालून सुस्त बसली होती. ह्या टळटळीत उन्हात माणसां साठी घराला सामावून घेणारी गाव मात्र उघड्यावर होती. गावातल्या दोन चार झाडांनी त्यांच्यावर मायेची सावली धरून ठेवली. सुर्व्या ला आपल्या मुळे होणार त्रास कळत होता, पण निसर्ग नियमाला बांधलेला तो बिचारा काय करणार. ऑक्टोबर मधे डिसेंबर सारखं ऊन तो कसा देणार. मिनिटकाटा त्याच्या गतिनिच चालला होता पण तो तासकाट्या सारखा उगाच time pass करत चालला आहे असंच सर्वांना वाटत होत.
सुर्व्या मावळती कडे झुकला, सावल्या लांबायल्या लागल्या तसा सगळ्यांनी निश्वास सोडला. सावली मधे फांद्या दुमडून बसलेली झाड आळोखे पिळोखे देत मोकळी झाली. दरीत निपचित पडलेला वारा शेपटी वर करून हुंदडणाऱ्या नवजात हरणाच्या पाडसा सारखा पिसाट सुटला होता. सभोवार चा दाह शमवण्याची जवाबदारी जणू त्याच्या कडे होती.
कापुराच्या जळण्याच्या वेगानी संधीप्रकाश आसमंतात विरून गेला आणि मढेघाटाच्या पठारावर रात्र अवतरली. दिवसभर सूर्याच्या प्रखरतेने जळणारी शृष्टि रात्री च्या कुशीत शिरली. काळोख जसा दाट होत चालला तशी अवकाशात एकएक मंडळी यायला लागली. पत्रिकेत घाबरवणारे शनी, मंगळ डोळ्यांना मात्र सुखावत होते. 'हे ग्रह माझ्याच नशिबाला का' असा प्रश्न मनात डोकवायला लागला कि एखाद्या निरभ्र रात्री डोंगरात जाऊन मस्त पाठ जमिनीवर टेकवून मन भरून आकाश पहावं, मनात नक्कीच सगळ्या बद्दल कृतज्ञतेची भावना येईल. म शनी आणि मंगळ पण मनाला सुखावतील, म ते सद्ध्या कोणत्याही घरात का असेनात.
आय लायनर सारखी डोंगरांची कड आकाशाच्या बॅकग्राऊंड पुढे मस्त दिसत होती. रातकिड्यांची बडबड शांततेची चिरफाड करत होती. आता वारा अंगाला झोंबायला लागला.
चंद्राचा पहिला प्रकाशकिरण जमिनीवर पडला तशी ती रोमांचित झाली. चंद्राला आपण जरी 'तो' म्हणत असलो तरी तो 'फेमिनाईन ब्युटी' नी ओतप्रोत भरलेला आहे. सूर्या च बुद्धी बरोबर गॉटमेट तर चंद्रा च नात मना बरोबर. म्हणूनच तर कोणाला त्याच्यात ससा दिसेल तर कोणाला कोण, क्या बात.
सगळ्या कडे साक्षीभावानी बघायचं असं कितीही ठरवलं तरी आपल्याच्यानी ते काही शक्य नाही. साधूसंतां पेक्षा गो.नि.दा आणि पाडगावकरां कडे मनाचं झुकत माप आहेना. काय करणार, काय करणार.
।। कृष्णार्पणमस्तु ।।
एकदम भारी
ReplyDeleteThanks 🙂
Deleteखूप सुंदर 👌👌👌
ReplyDeleteThanks re
Deleteअप्रतिम
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteअप्रतिम 👌👌
ReplyDeleteThank you 🙏
Deleteत्या झुकत्या मापातून गो नी दांची ताकद पण येत आहे तुझ्याकडे. जबरी वर्णन!
ReplyDeleteThanks re🙂
DeleteSuperb !
ReplyDeleteThanks thanks 🙂
Deleteसुरेन्द्र खूप सुंदर लिहितोस डोळ्या सामोर सगळे दृश्य उभे राहिले अप्रतिम
ReplyDeleteमनःपुर्वक धन्यवाद
Deleteनजरेसमोर इतकं नितांतसुंदर चित्र उभं राहिलय की आम्ही तिथेच आहोत असं वाटतंय हे संचितच आहे गोनीदांनी दिलेलं आणि तुम्ही जपून आम्हाला वाटलेल...तुकोबा ही हेच सांगतात .... निसर्ग सारखा गुरू आणि सोयरा कोणीच नाही.
ReplyDeleteखुप खुप धन्यवाद🙏
DeleteBhariii re! Dolyasamor ubha rahila sagala 👌👏
ReplyDeleteThanks 🙂
Deleteअप्रतिम लिखाण...शब्दातून सुंदर चित्रण उभा केलास 👌👌
ReplyDeleteखुप खुप धन्यवाद
Delete